Monday, November 26, 2012

fly in sky

आकाशी झेप घे रे...
 कधी-कधी साध्यासोप्या वाटणार्‍या गोष्टीतच खूप अडथळे येतात. थोडे प्रयत्न केल्यानंतर त्या गोष्टी आपल्याला अनुकूल व्हाव्यात असे वाटते. पण वारंवार प्रयत्न करूनही तसे घडत नाही. आपण वैतागतो. त्रागा करतो. प्रयत्न सोडून देतो. नशिबाला दोष देत चिडचिड करतो. काहीही कष्ट न करता इतरांना त्या गोष्टी सहज मिळाल्या असे म्हणत कुढत बसतो. त्या गोष्टी सहज मिळण्याची त्या लोकांची लायकी नव्हती असे म्हणतो. तुमच्याही बाबतीत असं घडलंय का कधी ? मग सुरवंटाचं फुलपाखरू होण्याची गोष्ट खास तुमच्यासाठी. सुरवंट आपल्या कोशातून बाहेर यायला सुरुवात करतो इवल्याशा छिद्रातून. त्या छिद्रातून तो आपले शरीर बाहेर काढतो. त्या वेळी त्याला खूप धडपड करावी लागते. या धडपडीमध्ये अनेकदा खूप दिवसही लागतात. या धडपडीदरम्यान निसर्ग त्या फुलपाखराच्या शरीरातील द्रव पंखामध्ये ढकलतो. त्यामुळेच त्या फुलपाखराला कोशातून बाहेर पडल्यावर लगेच उडण्याचे बळ मिळते. पण हेच जर इवल्याशा छिद्रातून फुलपाखरू बाहेर पडताना त्याला त्रास नको म्हणून त्या कोशाचे छिद्र कापून मोठे केले तर? तर त्या फुलपाखराला नीट
से उडता येणार नाही. त्याचे शरीर विचित्र आकाराचे बनेल. पंखांची वाढ होणार नाही. पर्यायाने निसर्गदत्त उडण्याचे बळ त्याच्या पंखांमध्ये येऊ शकणार नाही.म्हणूनच स्वकष्टावर मुक्त विहरण्यासाठी त्या फुलपाखराला स्वत: धडपड करावी लागते. निसर्गाने निर्माण केलेले अडथळे पार करावे लागतात. अगदी गरुडभरारीचे नसले तरी अवकाशात झेप घेण्याचे बळ, कुवत निसर्गाने प्रत्येकाला दिलीय. ती झेप घेताना पदोपदी अडथळे निर्माण केलेत तसेच प्रयत्नातले सातत्य राखण्याची संयमी वृत्तीही बहाल केलीय. अपयश दिलेय तसेच प्रयत्नांची कास धरण्याची हिंमतही दिलीय. आयुष्यात अडथळे निर्माण केलेत तसेच अडथळे पार केल्यानंतरच्या यशाची गोडी चाखण्याची संधीही प्रत्येकाच्या वाट्याला दिलीय. म्हणूनच वाटते की अडथळ्यांनी वैतागून जाण्यापेक्षा त्यांच्याकडूनच झेपावण्याचं बळ मिळवलं तर ? सगळ्या गोष्टी अनुकूल असताना सगळे आयते मिळाले तर कुणीही अटकेपार झेंडा लावेल. पण स्वत:च्या मेहनतीने, कष्टाने, अडथळे पार करत गरुडभरारी घेण्याचे सुख काही औरच असते नाही का ?

Monday, November 19, 2012

मी,तुझ्या मिठीतला स्वर्ग जगायला!!!

माझ्या जाण्याच्या दिवसाची वाट पाहतीये,
उरलेला प्रत्येक क्षणनक्षण माझ्यात जगायला,
वेडी कधी दिवसात तर कधी तासात वेळ मोजतीये,
वारंवार मला आठवण करून देतीये,
माहितीये मला ती तस का करतीये!

स्पष्टपणे न तीला काही बोलवेना न मला,डोळ्यांना मात्र कळतंय सार,नजरेतूनच चर्चा होते हल्ली आमच्यात!
तीच्या शिवाय जगण्याच्या विचाराने,थरकाप उडालाय माझ्या मनाचा,भावनांचाही कडेलोट झालाय केव्हाच,क्षण हा येणार हे दोघांनाही होते माहित,पण तरीही मन मात्र तयार होईना निघायला!

हातात हात घेउनी, नजरेला नजर भिडवूनी,घेताना तीचा निरोप,होणार माझे पानिपत!
पण,जाताना देईल तीला मी भरवसा,असलो जरी साता-समुद्रापार तरी राहील तुझ्या मनात,तुझ्या प्रेमाची सावली, जाणवेल मला तिथेही,आठवशील तू प्रत्येक श्वासाला,जाणवेल तुलाही अस्तित्व माझ,पापणी आपली लावताना!

तिथेच असेल मी तुझ्या मनात खोलवर रुजलेला,जाणीव…….
तू मनाने सोबत असल्याची पुरवून घेईल मी स्वतःला!
वेडे विश्वास ठेव!तुझ्या शिवायचा हा प्रत्येक क्षणही,फक्त तुझाच असेल,असेल तुझ्याच प्रेमात तो बहरलेला!
वाट पहा!लवकरच परतेन मी,तुझ्या मिठीतला स्वर्ग जगायला!!!

प्रवासी

ह्या जगातील आपण
काही काळाचे रहिवासी
अनंताच्या यात्रेला
मग निघतो प्रवासी ......

कोठून येतो - नाही ठाऊक,
कुठे जायचे नसते माहित
तरीही वणवण करीत असतो .......भटका प्रवासी

मिळेल तिथे करितो वस्ती
जुळेल तेथे जुळवीत नाती
अनंत स्मरणे ठेवुनी मागे .........निघतो प्रवासी

किती झुंजतो आणि झगडतो
अहंपणाचा नाग दंशतो
लोभ-राग पण अखेर निष्फळ .......निघतो प्रवासी

तर्हेतर्हेचे बेतही रचतो
कसली कसली हावही धरतो
असा अधाशी, तरी उपाशी ..........निघतो प्रवासी

जन्मजन्मीच्या फेर्यांमध्ये
फिरतो प्रवासी ......
पिढ्यापिढ्याच्या वस्त्रामधला
धागा-प्रवासी ..............

Friday, November 16, 2012

ओळख प्रेमाची(एक प्रेमकथा)

समर हा असा मुलगा आहे ज्याने कधीही प्रेमावर विश्वास नाही ठेवला..
आणि याच गोष्टीवरुन त्याचे त्याच्या मित्रांशी नेहमी वाद व्हायचे..
तो इतका कॉन्फीडंट होता की आपण या जगातल्या कोणत्याही मुलीचं हृदय परीवर्तन (शुद्ध भराठी भाषेत याला"पोरगी पटवणे"असं म्हणतात) करु शकतो,असं त्याला वाटायचं..

या जगात प्रेम नावाची कसलीही गोष्ट नसुन फक्त वासनाच आहे असं त्याचं म्हणणं होतं..

एक दिवस त्याच्या मित्रांनी त्याच्याशी पैज लावली की जर तु योगिता आणि जय या प्रेमवीरांना वेगळं करुन दाखवलंस तर तुझी गोष्ट आम्ही सर्वार्थाने मान्य करु..
त्याने पैज स्वीकारली..
समर हा खरातर खुपच हुशार मुलगा आहे..
मुली पटवण्याची त्याची आपली एक वेगळीच स्टाईल आहे..
आणि खरंच त्या स्टाईलवर एक दिवस योगिता घसरली..
ओळख
झाली,चांगली मैत्री ही झाली..
पण एक दिवस खरंच जेव्हा ठरल्याप्रमाणे प्रेमातील नाटकाचा एक भाग म्हणुन समरने तिला I LOVE YOU म्हटलं..
तेव्हा त्याचं उत्तर देण्याआधी तिने जयबरोबर केलेल्या breakup बद्दल सगळं सांगितलं..

त्याने त्यावर काहीही आक्षेप घेतला नाही..
मग त्याने तिला त्याच्या या कारणासहीत तिला स्वीकारण्याचं नाटक केलं..
आणि एका कच्च्या पायावर
उभ्या असलेल्या रिलेशनशिपमध्ये ते राहु लागले..
एकमेकांसोबत ते वेळ घालवु लागले..
आणि याचीच जाणीव त्याने मित्रांना करुन दिली..

मित्रांनाही त्याची बाजु मान्य करावीच लागली..
त्यानंतर त्याने अधिकृतरित्या तिच्याशी breakup केला..
ती खुपच दुःखावली गेली कारण breakup चं योग्य कारणच तिला कळलं नव्हतं..
पण समरला ही परिस्थिती काही नवीन नव्हती..
त्याने असे कित्येक breakups याआधीही केले होते..
पण आता येणारी परिस्थिती त्याच्यासाठी नवीन होती..

तिला तिचा गोड आवाज सारखासारखा आठवु लागला..
तिचा चेहरा समोर
दिसायचा..
वार्याची झुळुक तिचा सुगंध घेऊन यायची..
पाण्याच्या स्पर्शात
त्याला तिची जाणीव व्हायची..
पुन्हापन्हा आरशासमोर जाऊन उभं राहायचा..
काय होतंय हे कळतंच नव्हतं..

आणि एक दिवस स्वप्नात योगिता आली..
खुपच दुःखी होती ती..
breakup
मुळे ती आत्महत्या करायला चालली होती..
ती दहा मजली ईमारतीवरुन
उडी मारुन जीव देणार तेवढ्यात त्याला जाग आली..
समोर त्याची धाकटी बहीण दिशा त्याच्यासाठी bed tea घेऊन आली होती..

ती म्हणाली,.gd moning दादा..
हा घे चहा..
त्याने चहा घेतला..
योगिताबरोबर तु असं करायला नको होतंस दादा..
तुला कसं कळलं योगिताबद्दल..??
तु पुन्हा माझी डायरी पुन्हा वाचलीस..
थांब तुला मी आता बघतोच....

दिशाःsorry sorry मी पुन्हा नाही असं करणार..

समर ः ok..(थोडा विचार करुन)
खरंच मी चुकलो का गं..??

दिशा ः होय खुपच..
मुलगी एखाद्या मुलावर प्रेम करते तेव्हा ती त्यालाच सर्वस्व मानते..
आणि तु
तर तिचा विश्वास तोडुन तिचं सर्वस्वच हिरावुन घेतलंस..
तुला एक सांगते जय नावाचा जो मुलगा आहे ना त्याने स्वतःच्या गळ्याला चाकु लावुन योगिताचा होकार मिळवला होता..
म्हणुन ते नातं एक ना एक दिवस तुटणारच होतं फक्त याला कारणीभुत तु ठरलास...

समर ः खरंच..
आणि मीही खुपच चुकीचं वागलो..
मी खुपच practically वागायचो..
मला माहीती नव्हतं की प्रेम ही practically नाही heartly करण्याची गोष्ट आहे..
तुला मी एक खरं सांगु का मी खरंच योगिताच्या प्रेमात पडलोय गं..

दिशा ः अरे मग जाउन सांग ना तिला..

समर ः पण ती मला माफ करेल..?

दिशा ः तिचं तुझ्यावर खरं प्रेम आहे ना..??
मग नक्की माफ करेल..

दिशाचं ऐकुन त्याने योगिताची शोधाशोध सुरु केली..
ती तिच्या आजीकडे गेलीय,
हे
समरला कळलं..
तिच्या प्रेमाची एक परीक्षा म्हणुन तो एका नवीन रुपात तिच्यासमोर प्रेझेँट झाला पण थोडाही वेळ न लावता तिने त्याला ओळखलं..
त्याला पाहुन तिला प्रचंड आनंद झाला..
त्याने तिची मनापासुन
माफी मागितली..
आणि आपल्या मनातलं खरं प्रेम त्याने व्यक्त केलं..
योगितानेही वेळ न दवडता त्याला मोठ्या मनाने माफ केलं..
आणि तिने समरला आहे तसं स्वीकारलं..
मित्रांनो ही होती समरची प्रेमकथा,
पण प्रत्येकाच्या प्रेमाचा शेवट असा गोड होईलच असा नाही..
हा पण जरा समझदारीने निर्णय घेतला तर जवळजवळ प्रत्येक lovestory चा शेवट हा गोडच होईल..
 
आता तीच्यावर कवीता

आता तीच्यावर कवीता
मला सुचतच नाही.

कारण ती मला आजकाल
दिसतच नाही.

सतत मी फक्त तीलाच
शोधत फिरत असतो.

पण ती दिसल्यावर तीला
... न पाहिल्या सारखे भासवतो.

असे मी का केलं म्हणुन
स्वतावरच रागावतो.

खरच तीच्यवर प्रेम
तर मी खुप करतो.

पण तीला हे सांगायला
पण खुप घाबरतो.

तरीही सांगायचा तिला
निर्धार करतो.

पण ती नाही बोलली
तर माझे काय? असाही
मी विचार करतो.

म्हणुनच थांबलोय मी
योग्य वेळेची वाट पाहत.

कढतोय प्रत्येक रात्र
तीच्या आठवणीत जागत.

Love

कधी मलाच कळत नाही,
प्रेम मला येत नाही..
अगं प्रेमच करतोय मी,
तु करावं असं मी म्हणत नाही..
प्रेम कर माझ्यावर,
मि तुला म्हणणार नाही..
मी मात्र जळत राहणार,
जोवर तुला कळणार नाही..
किती दिवस असं
वागशील,
एकदा तरी प्रेमाने बघशील..
जळलेल्या प्रेमाची
आठवण काढशील,
तुला कळून चुकेल..
माझं प्रेम खरं होतं,
उशीर झाला असेल..
प्रेत माझं जळत होतं,
मी शांत होईनचं..
राख थंड होईलचं,
माझं प्रेम आठवेलचं..
माझा भास होईलचं,
तुला माझी आठवण येईलचं..

marathi article

दोघं एकाच शाळेत आणि मग एकाच कॉलेज मधे होते..
इतक्या वर्षांची छान मैत्री होती दोघांची..

ती - दिसायला अतिशय सुंदर, सतत बोलणारी, सतत हसणारी, खूप हुषार..
तो - अतिशय साधा, गप्प-गप्प राहणारा, अगदी चार-चौघांसारखा..

सतत बरोबर असायचे दोघं - अभ्यास, खेळ, सिनेमा, पिकनिक, टाइम-पास - काहीही असो - ना ती कधी त्याला बोलवायला विसरायची,
ना तो कधी तिला सोडुन कुठे जायचा..
खरं म्हणजे ती त्याला हक्कानेच बोलवायची..
आणि त्याला तिला सोडुन कुठे एकटं जाणं शक्यच नव्हतं..
"अरे..! आज मला युनिव्हरसिटीत थोडं काम आहे.. येतोस का बरोबर..?"

असा नुसता तिचा फोन आला..
आणि तो जेवण अर्धवट सोडुन तसाच बाईक घेऊन तिच्या घरी पोचला.. त्याची आई म्हणतच राहिली त्याच्या पाठीमागे,
"अरे, निदान जेवण तरी संपव..."
पण त्याला कुठे भान होता...
बाईकवर ती नेहमी त्याच्याच मागे बसायची..
आणि तो ही दुसऱ्या कुठल्या मैत्रिणीला मागे बसु द्यायचा नाही..
ती दमली असेल तर त्याच्या खांद्यावर डोकं ठेवायची..
तीचे केस वाऱ्यानी उडायचे,
हलकेच त्याच्या गालवर बसुन त्याला गुदगुली व्हायची..
लहानपणापासुनच दोघं एकत्र असल्याने दोघांचं एकमेकांच्या घरी येणं-जाणं होतं..

तिचं एक स्वप्न होतं - तिला युनिव्हर्सिटीचं गोल्ड मेडल हवं होतं..
त्या करता ती मेहनतही तशी घेत होती..
तास न तास अभ्यास करत होती..
सोबतीला तो बसुन रहायचा..
तिला झोप येऊ नये, तिचं concentration राहावं म्हणुन रात्री तिला तिची आवडती कॉफी करुन द्यायचा..
तिचा वेळ नको वाया जायला म्हणुन तिच्या करता नोट्स,
पेपर्स झेरॉक्स करुन आणायचा..

परीक्षा झाली..
निकाल लागले..
त्याला फर्स्ट क्लास मिळाला..
त्याच्या करता तो खरं जास्तीच होता..
आणि ती..?
तिचं स्वप्न पूर्ण झालं..
तिला गोल्ड मेडल मिळालं..

त्या दिवशी संध्याकाळी ती भेटली त्याला..
हातात एक लाल गुलाबाचं फुल होतं तिच्या..
तो प्रचंड खुष होता - फर्स्ट क्लास करता नाही,
तर तिला गोल्ड मेडल मिळालं म्हणुन..

"आज मी खूप खुष आहे..
एक गंमत झाली..
तुला विनय आठवतोय..?
दादाचा बेस्ट फ्रेंड..?
अमेरीकेला असतो गेले २ वर्ष..
परवाच आला तो १५ दिवसांकरता..

आज त्याला कळलं माझ्या रिझल्ट बद्दल..
म्हणुन हे गुलाब घेऊन आला मला congratulate करायला..
आणि त्यानी मला चक्क प्रपोज केलं..!!
म्हणजे पूर्वी तो इथे असताना माझा क्रश होताच त्याच्यावर..
पण मला कधी वाटलं नव्हतं की आपलं त्याच्यावर प्रेम असलं तरी तो माझ्याकडे बघेल म्हणुन..!
मला म्हट्ला की अमेरीकेला मला पुढचं शिकता येईल..

आई-बाबांना सुद्धा तो पटला..
त्यांनी पण लगेच हो सांगीतलं..
येत्या रविवारी साखरपुडा आहे..
त्याला लवकर परत जायचं आहे ना...
म्हट्लं तुला येऊन आधी सांगते..
तुला पण कोणी आवडत असेल,
तर तु मलाच पहिलं सांगशील ना..?"

तो गप्प राहिला... नेहमी सारखा.. नुसतंच"हं"केलं..
तिचं लक्ष नव्हतंच नाहीतरी..
ती त्या गुलाबाकडेच बघत होती..